कोरोना व्हायरस मुळे जगभरात लॉकडाऊन असल्याने सर्वच सेवा बंद आहे. या कारणानेच भारतात व महाराष्ट्रात सर्वच चित्रपटांचे व मालिकांचे चित्रीकरण देखील थांबविण्यात आले आहे. यामुळे सर्वच कलाकार त्यांचा वाढदिवस घरीच साजरा करताना दिसून येत आहेत.
Akshaya birthday special झी मराठीवरील मालिकेतील एखाद्या कलाकारांचा जेंव्हा वाढदिवस असतो तेंव्हा ते मालिकेच्या सेटवरच वाढदिवस साजरा करताना दिसतात. झी मराठीची लोकप्रिय मालिका “तुझ्यात जीव रंगला” मधील अभिनेत्री अंजलीबाई म्हणजेच अक्षया देवधर हीचा पण वाढदिवस गेली दोन-तीन वर्ष आपण पण सेटवरच साजरा करण्यात आला.
Akshaya birthday special परंतू यावेळी लॉकडाऊन असल्याने अंजलीने 13 मे रोजी घरीच वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवशी एक सुंदर केक बनविण्यात आला होता.
अक्षयाच्या वाढदिवशी तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अभिनेता हार्दिक जोशी याने स्पेशल शुभेच्छा दिल्या. हार्दिक ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर अक्षयाला शुभेच्छा देताना तिची भरभरून प्रशंसा केली. “तुझ्यासारखी गुणवान अभिनेत्री सोबत असेल तर जीवन खूप सुंदर वाटते. तू माझी अत्यंत जवळची मैत्रिण असून तुझा वाढदिवस तुझ्यासारखाच स्पेशल असेल, हीच आशा करतो.
हार्दिक जोशी ने जरी अक्षयला वाढदिवसाच्या अशा गोड शब्दात शुभेच्छा दिल्या असल्या तरी अक्षयाचा जवळचा मित्र अभिनेता सुयश टिळक याने मात्र तिला शुभेच्छा दिला नाही. दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो देखील केले आहे.