बॉलीवुड मध्ये कोणाचे कधी भाग्य उजळेल हे सांगता येत नाही. एखाद्या कलाकाराला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि जर तो चित्रपट हिट झाला, तर ते कलाकार आयुष्यभर प्रेक्षकांच्या आठवणीत राहतात. असेच काहीतरी बजरंगी भाईजान या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या “हर्षाली मल्होत्रा” हीचे पण भाग्य या चित्रपटामुळे उजळले.
कबीर खान दिग्दर्शित बजरंगी भाईजान या चित्रपटात सलमान खान, करीना कपूर, नवाजुद्दीन सिद्दिकी असे अनेक मुख्य कलाकार होते. कथानकाप्रमाणे चित्रपटात एका लहान मुलीची ची गरज होती. तेव्हा कबीर खान यांनी हर्षालीला पाहिले व त्यांनी तिच्या घरी जाऊन तिला चित्रपटात काम करण्यासाठी मागणी केली. ज्यावेळी चित्रपटाची शूटिंग सुरू झाले त्यावेळेस हर्षाली केवळ सहा वर्षाची होते.
हर्षालीचा “बजरंगी भाईजान” चित्रपटातील शाहिदा(मुन्नी) हे पात्र सगळ्यांनाच खूप आवडले. या चित्रपटातील यशामागे हर्षालीचा पण मोलाचा वाटा होता. तिला या चित्रपटासाठी अनेक अवार्ड देखील भेटले होते. या चित्रपटानंतर हर्षाली ने अनेक जाहिराती केल्या आहेत. असे ऐकण्यात येत आहे की तिने आणखीन एक चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे.
पाच वर्षानंतर हर्षाली आता कशी दिसते हाच प्रश्न सर्व प्रेक्षकांना पडला होता. हर्षाली अगोदर जशी सुंदर दिसायची, आताही ती तितकीच सुंदर दिसते. हर्षाली आता 11 वर्षाची झाली असून सोशल मीडिया वर ती खूप ऍक्टिव्ह असते. टिक टॉक वर तिचे अनेक व्हिडीओ पोस्ट करीत असते.
माहिती आवडली तर नक्की शेयर करा