कृष्ण अभिषेक आणि कश्मेरा शहा
बॉलिवडचा विनोदी अभिनेता गोविंदा यांचा भाचा म्हणून सुरुवातीला कृष्णाची ओळख होती. परंतु त्याने आपल्या कौशल्यामुळे व आपल्या विनोदी शैलीमुळे स्वतःच्या जीवावर नाव कमावले. काही बॉलिवूड चित्रपटात देखील कृष्णाने उत्तम अभिनय केला आहे. कृष्णाची पत्नी कश्मेरा शहा ही खूपच सुंदर आणि हॉट दिसते. दोघांनी 2003मध्ये विवाह केला होता.
अली असगर आणि सिद्दिका असगर :
अली असगर कॉमेडी दुनियेतील एक अनुभवी विनोदवीर म्हणून ओळखला जातो. कपिल शर्माच्या शोमध्ये तो कपिलची नानी म्हणजेच आज्जीचे पात्र साकारताना दिसतो. अली आणि सिद्दीकाने 2005 झाली लग्न केले होते.
किकू शारदा आणि प्रियंका शारदा :
कपिल शर्माच्या शो मधील एक महत्वाचे घटक असणाऱ्या किकूने त्या शोमध्ये पलक आणि बच्चा यादव असे महत्त्वाचे मात्र एकदम उत्तम रित्या साकारले. कीकू आणि प्रियांकाचा विवाह 2003 ला झाला असून दोघे नच बलिये सीझन 6 मध्ये सहभाग नोंदविला होता.
सुनील ग्रोव्हर आणि आरती ग्रोव्हर :
कपिल शर्माच्या अगोदरच्या शो ला प्रसिद्धी मिळवून देण्यात सुनील ग्रोव्हर चा महत्त्वाचा हात होता. त्या शो मध्ये सुनीलने गुड्डी आणि डॉक्टर गुलाटी ची भूमिका साकारला होता. सुनील ने काही चित्रपटात देखील काम केले आहे. त्याची पत्नी आरती खूपच सुंदर दिसते.
चंदन प्रभाकर आणि नंदिनी खन्ना :
कपिल शर्माच्या शोमध्ये चाय वाला चंदू हे पात्र साकारणारा चंदन प्रभाकर आपल्या अचूक कॉमेडी मुळे प्रसिद्ध आहे. प्रत्येक भागात चंदूची एन्ट्री दाखविली जाते. चंदने 2015 साली नंदिनी खन्ना सोबत लग्न केले होते.
कपिल शर्मा आणि गिन्नी चथरथ :
एका कॉमेडी शो मधून पुढे आलेला कपिल शर्मा यांनी अल्पावधीतच अनेक यश प्राप्त केले. त्याच्या शोमधून तो नेहमीच प्रत्येक अभिनेत्रींना फ्लर्ट करताना दिसत असतो. कपिलने गिन्नी सोबत 2018 साली विवाह केला होता व तो आता एका मुलीचा बाप देखील झाला आहे.
माहिती आवडल्यास share नक्की करा.