कोणतेही कलाकार स्वतःच्या हिमतीवरच पुढे जाऊ शकतात. जर स्वतःमध्ये टॅलेंट असेल तर कोणत्याही क्षेत्रात नाव कमवू शकतात. परंतु परिवारातील कोणी सदस्य अगोदरच एखाद्या क्षेत्रात असेल तर त्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी कोणालाही सोपे जाते.
झी मराठीवरील “माझा होशील ना?” या नवीन मालिकेतील “सई” गौतमी देशपांडे हीच्यातिल एक प्रेक्षकांना माहिती नसलेले टॅलेंट बद्दल जाणून घेऊयात. 31 जानेवारी 1992 रोजी पुणे येथे गौतमी चा जन्म झाला. तीचे शिक्षण पुण्यातच झाले.
गौतमी ही प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची सख्खी बहिणी असून दोघी बहिणींना गायनाची खूप आवड आहे. दोघी बहिणी उत्तमरित्या गायन करतात.
दोघींचे गाणे म्हणतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. गौतमी खरे तर एक प्रोफेशनल सिंगर आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे. आता या दोघी बहिणींचा गाणे म्हणताना चा व्हिडिओ समोर आला आहे..या दोन्ही प्रतिभावंत बहिणींना मर्द मराठी तर्फे खूप खूप शुभेच्छा.
पाहा व्हिडिओ..
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा.