कोणतेही कलाकार स्वतःच्या हिमतीवरच पुढे जात असतात. स्वतःमध्ये टॅलेंट असेल तर अभिनय क्षेत्रात खूप नाव कमवू शकतात. परंतु परिवारातील कोणी सदस्य अगोदरच कला क्षेत्रात असेल तर अभिनयात पदार्पण करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला सोपे जाते.
झी मराठीवर काही महिन्यापूर्वी “माझा होशील ना” या नवीन मालिकेत “सई” नावाचे पात्र करणारी अभिनेत्री गौतमी देशपांडे हिच्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. 31 जानेवारी 1992 रोजी पुण्यात गौतमी चा जन्म झाला. तीने पुण्यातच शालेय आणि महाविदयालयीन शिक्षण पूर्ण केले.
अभिनयासोबतच गौतमीला गायनाची देखील खूप आवड आहे. गौतमी एक प्रोफेशनल सिंगर आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे. तिचा आवाज एखाद्या उत्तम गायिके सारखाच आहे. गौतमी ही मराठी चित्रपटसृष्टी मधील नामांकित अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची सख्खी बहीण आहे.
अनेक मोठ्या चित्रपटात आपल्या अभिनयाने आणि आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या मृण्मयीला आपली बहीण अभिनयक्षेत्रात आल्याचे खूप आनंद वाटतो. गेल्यावर्षी सोनी मराठी वरील “सारे तुझ्याचसाठी” या या मालिकेतून अभिनय क्षेत्रात गौतमी ने पदार्पण केले होते. त्यावेळी मृण्मयीने देशपांडेची दुसरी मुलगी अभिनय क्षेत्रात आली, अशी पोस्ट केली होती. या दोन्ही प्रतिभावंत बहिणींना भावी करियरसाठी मर्द मराठी तर्फे खूप खूप शुभेच्छा.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा.