प्रत्येक स्त्रीचे लग्नानंतर आपल्या होणाऱ्या पती सोबत आयुष्यभर सुखाने संसार करावा असे स्वप्न असते. पण एखाद्या महिलेचा पती लवकरच मृत्यू पावल्यास तिला नंतर विधवा म्हणून पूर्ण आयुष्य काढणे खूप अवघड असते. मध्यप्रदेश येथील रतलाम जिल्ह्यात असेच एका महिलेचा पती तिला लवकरच सोडून गेला. परंतु नंतर जे काही झाले ते ऐकून तुम्हालाही कौतुक वाटेल.

inspirational story

6 वर्षापूर्वी सरला जैन या काटजू नगर येथील 65 वर्षीय महिलेने आपल्या मुलाचे लग्न सोनम नामक एका मुलीशी केले होते. तीन वर्ष संसार चालल्यानंतर सोनमच्या नवऱ्याचे कॅन्सरमुळे निधन झाले. पतीच्या मृत्यूनंतर खचून गेलेल्या सोनमला सासू-सासर्‍यांनी तिला आपल्या मुलीप्रमाणे जपले व तिला कधीच दुःख होवू दिले नाही.

inspirational story

पतीच्या मृत्यूनंतर सोनमला सासू-सासर्‍यांनी तीन वर्ष मुली प्रमाणेच सांभाळले. परंतु पतीशिवाय संसार काढणे किती अवघड असते याची जाणीव ठेवत व स्वतःची वाढते वय पाहून सासू-सासर्‍यांनी सोनम चे दुसरे लग्न करण्याचा विचार केला. सरला जैन यांनी त्यांच्या भावाला व सोनमच्या कुटुंबातील सदस्यांना या बाबतीत विचारणा केल्यास सर्वांनी त्वरित होकार दिला.

inspirational story

सर्वांनी होकार दिल्यानंतर सोनमचा विवाह नागदा येथील एका व्यक्तीशी करण्याचे ठरले. परंतु सध्या लॉकडाऊन चालू असल्याने काही अडथळे आले. पण नंतर सरकारची संमती घेऊन हा विवाह काही मोजक्या नातेवाईकांना घेऊन व सर्व नियमांचे पालन करत पार पडला. ज्या घरात सून म्हणून आलेली मुलगी 4 मे रोजी त्याच घरातून विवाह करून सासरी नांदायला गेली. त्यामुळे सर्वच स्तरातून या विवाहाचे कौतुक होत आहे.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *