कोरोना वायरस भारतात आल्यापासून भारताला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. या व्हायरसमुळे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हाहाकार माजला आहे. अनेक देशांना त्वरित लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागला. भारतातही वेळेतच लॉकडाऊन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक नुकसानीचे विचार न करता वेळेतच सर्व व्यवहार बंद करून लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेक लोकांना आहे त्या ठिकाणीच थांबावे लागले. बाहेरगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी राहिलेले अनेक लोक अडकून पडले. परंतु सरकारने अशा लोकांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी मागील काही दिवसात सोय केली.
महाराष्ट्रात अडकलेल्या परप्रांतीय कामे बंद असल्याने अनेक संकटांना सामोरे जात होते. परंतु महाराष्ट्रातून रेल्वेतून निघताना काही परप्रांतीय पोलिसांना शिव्या देताना दिसून आले.
त्यामुळे महाराष्ट्रातील लोक खूपच संतापले होते. परंतु हेच लोक ज्यावेळी त्यांच्या राज्यात गेली त्यावेळी त्यांची कसून चौकशी केली जाऊ लागली. त्यावेळी एका माणसाने महाराष्ट्राची प्रशंशा केली. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील आहे.
पाहा व्हिडिओ :