कोरोनाव्हायरस भारतात आल्यानंतर भारताला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळी सुरुवातीला लॉक डाऊन ची घोषणा केली होती त्यावेळी सर्वजण आपापली कामे सोडून स्वतःच्या गावी परतले. परंतु काही लोकांनी या निर्णयाला गांभीर्याने घेतले नाही व काही लोकं होते तिथेच अडकून राहिले.
जे लोक आपापल्या गावाकडे जाऊ शकले नाहीत, त्यांचे खूप हाल होताना दिसले. नोकरी करणारे, शिक्षणासाठी बाहेर असणारे तरुण पिढीचे खाण्या पिण्याचे हाल होता दिसत आहेत. विरार येथे एकटा एका तरुणाचा मृत्यू झाला. तो आपल्या परिवारा पासून दूर राहायचा. त्याचा मृत्यू झाल्या नंतर त्याचे अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न पडला हो
विरार पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक श्री. सुभाष शिंदे यांनी माणुसकीचे उत्तम उदाहरण दिले आहे. त्यांनी मागचा पुढचा काहीही विचार न करता त्या पदवीधर मुलांचे अंत्यसंस्कार केले. तसेच त्यांनी त्या मुलाच्या नातेवाईकाला व्हिडीओ कॉल द्वारे पण अंतदर्शन घडविले.
पाहा व्हिडीओ…