जगभरात आपल्या सारखे दिसणारे 7 लोक असतात असे बोलले जाते. जेव्हा एखादा कलाकार प्रसिद्धी मिळवतो, त्यावेळी त्यांचे हुबेहूब कॉपी असणारे कोणी ना कोणी समोर येत असतात. मराठी मधील काही अभिनेत्री त्यांच्या फोटोज् मध्ये बॉलिवूड अभिनेत्री सारखे दिसतात.
1. ऋतुजा बागवे – दीपिका पदुकोन
झी मराठीच्या नांदा सौख्यभरे मालिकेतून प्रसिद्धी मिळवणाऱ्या ऋतुजा बागवे हिला दीपिकाची कॉपी असल्याचे बोलले जाते. एका शोमध्ये हे देखील तिला तू सेम दीपिका सारखी दिसते असे म्हटले होते. परंतु ऋतुजाला तिच्या आवडते अभिनेत्री कोण आहे विचारले असता, तिने विद्या बालन आणि रेखा यांचे नाव घेतले होते.
2. मानसी नाईक – ऐश्वर्या राय
मराठीची आइटम सॉन्ग क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली मानसी नाईक ही तिच्या मादक आदांसाठी प्रसिद्ध आहे. तिने मागे काही फोटोज इंस्टाग्राम अकाउंट ला अपलोड केले होते. त्या फोटोमध्ये ती सेम ऐश्वर्या राय सारखी दिसत होती. या फोटोमध्ये मानसी ऐश्वर्या सारखेच खूप सुंदर देखील दिसत होती.
3. धनश्री काढगावकर – प्रियंका चोप्रा
झी मराठीवरील “तुझ्यात जीव रंगला” मालिकेतील वहिनीसाहेब म्हणजेच धनश्री काढगावकर ही काही फोटोजमध्ये सेम प्रियंका चोप्रा सारखी दिसत आहे. धनश्रीने काही दिवसांपूर्वी बीच वरील या फोटोज शेअर केल्या होत्या त्या फोटोंना पाहून अनेक फॅन्स नी देखील प्रियंका सारखी दिसते, अशा कमेंट्स केल्या होत्या.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..