आज आपण पाच मराठी अभिनेत्री यांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार सोबतच्या फोटोज पाहुयात.
5. स्पृहा जोशी : झी मराठीवरील “एका लग्नाची दुसरी गोष्ट” या मालिकेतून येशील मिळणाऱ्या स्पृहा जोशी हिने वरद लघाटे या अभिनेत्यासोबत विवाह केला केला. दोघांचा विवाह 2 डिसेंबर 2014 रोजी झाला होता. स्पृहा अभिनयाप्रमाणेच एक कवयित्री म्हणून देखील प्रसिद्ध आहे.
4. प्रार्थना बेहेरे : आपल्या या आगळ्यावेगळ्या हसण्याने प्रसिद्ध असलेली सुंदर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हीदेखील विवाहित आहे. तीचा विवाह दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्यासोबत झाला होता. प्रार्थनाचे मितवा, मिस्टर अँड मिसेस सदाचारी हे काही गाजलेले चित्रपट होते.
3. मृणाल दुसानीस : झी मराठीवरील “माझिया प्रियाला प्रित कळेना” या मालिकेतून प्रसिद्धी मिळवणाऱ्या मृणाल दुसानीस हिचे नीरज मोरे या व्यक्तीशी विवाह झाला. 25 फेब्रुवारी 2016 ला मृणाल ने पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या नीरज मोरे सोबत विवाह केला.
2. धनश्री काढगावकर : “तुझ्यात जीव रंगला” या मालिकेत आपल्या बेधडक अभिनयाने सर्वांची मनं जिंकणाऱ्या नंदिता वहिनी म्हणजेच धनश्री काढगावकर ही देखील विवाहित आहे. दुर्वेश देशमुख या व्यक्तीसोबत धनश्रीचा विवाह झाला होता. “तुझ्यात जीव रंगला” मालिकेत तिचा रोल निगेटिव असला तरी तिचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला.
1. प्रिया बापट : सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असणाऱ्या प्रिया बापट हिचा विवाह उमेश कामत या अभिनेत्यासोबत झाला होता. उमेश कामत हादेखील प्रिया सारखेच मराठी चित्रपट सृष्टीत नाव कमावले आहे.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा.