कोरोनाव्हायरस आल्यापासून लॉकडाऊन काळात सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या ट्रेंड्स चालत आहेत. आता त्या ट्रेंड्स मध्ये आणखीन एका ट्रेंड चा समावेश झाला आहे. घरात बसून कंटाळलेल्या महिलांनी आता “नथीचा नखरा” नावाचा ट्रेंड सुरू केला आहे.
स्वतः नथ घातलेला फोटो स्टेटस ला टाकून आपल्या मैत्रिणी व नात्यातील महिलांना टॅग केले जाते. ज्यांना टॅग केले त्यांनी देखील नथ घालून ते चॅलेंज पूर्ण करून फोटो स्टेटस ला ठेवायला सांगत असतात.
सर्व महिलांचे व्हॉट्सअँप स्टेटस आता नथ घालून नटलेल्या फोटोज् ने भरलेले दिसून येत आहेत. या उपक्रमाला सर्व महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. खूप महिला आपल्या फोटोज् शेयर करताना दिसून येत आहेत.
याअगोदरही साडी घातलेल्या ट्रेंड, माय लेकीच्या फोटोज् चा ट्रेंड असे अनेक ट्रेंड महिलांनी घर बसल्या चालविले होते. अशा ट्रेंड्स मुळे महिलांना घर बसल्या चांगली करमणूक होत आहे, हे नक्की.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा.