कोरोना व्हायरस मुळे सर्वत्र परिस्तिथी बिकट होत चालली आहे. सर्वत्र लॉकडाऊन चालू असल्याने कोणीही घराबाहेर पडत नाहीत. अशातच रस्त्यावर वाहनांचे प्रमाण कमी झाल्यामुळे प्रदूषणावर देखील नियंत्रण ठेवण्यात आले आहे.
लोकांची रस्त्यावरील संख्या कमी झाल्याने अनेक प्राणी रोड वर आलेले आपण पाहिले आहेत. विविध प्रकारच्या प्राण्यांच्या रोडवरील व्हिडिओज व्हायरल झाल्या आहेत. पण आता आणखीन एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात चक्क साप भरकटत एका एटीम मध्ये घुसला.
हा व्हिडिओ उत्तरप्रदेश मधील गाझियाबाद येथील आहे. एक तरुण पैसे काढण्यासाठी एटीम मध्ये पैसे काढायला गेला आणि आत मध्ये जाण्याअगोदर त्याला एटीम मध्ये मोठा कोब्रा साप दिसला.
हा साप इतका मोठा होता होता की त्याची लांबी 7 फूट होती. लोकांना पाहून तो साप चक्क एटीम मध्ये गेला. नंतर सर्प मित्राला बोलून या सर्पाला पकडण्यात आले आहे.
पाहा व्हिडिओ :