कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. अशातच जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर जवळपास सर्व व्यवसाय बंद असल्याचे दिसून येत आहे. परंतु ज्या ठिकाणी कोरोनाचा धोका आहे, अशा ठिकाणी काही प्रमाणात व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत.

harshal and reshma pune

एप्रिल – मे महिना म्हटला की प्रत्येक वर्षी लग्नाच्या तारखा असतात. परंतु यावर्षी कोरोना मुळे बहुतांश लग्नाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लग्न समारंभ परवानगी नसल्याने असे निर्णय घ्यावे लागत आहेत. परंतु काही जोडपे पोलिसांची संमती घेऊन व सर्व नियमांचे पालन करून विवाह करताना देखील दिसत आहेत.

harshal and reshma pune

मागे नाशिक येथील विवाहाला पोलिसांनी बिल्डींग खाली उभे राहून एका जोडप्याला शुभेच्छा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता तसाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पुण्यातील असून एका जोडप्याने पुण्यात सोशल डिस्टसिंगचे पालन करत विवाह केला. चि. हर्शल पवार राहणार धनकवडी व चि.सौ.का. रेश्मा राहणार कोंढवा यांचा विवाह झाल्यानंतर ते जात असताना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर ताम्हाणे साहेब यांनी वाह वाह रामजी हे गाणे लावून स्वागत केले.
पाहा व्हिडिओ :


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *