संपूर्ण भारत कोरोनाच्या विरुद्ध लढा देत आहे.डॉक्टर्स ,पोलीस हे हे त्यांची कामे जबाबदारीने पार पाडताना दिसत आहेत त्यातच पोलीस ही आपली सामाजिक बांधिलकी जपत कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत व कोरोनाच्या संकटात कर्तव्य बजावताना पोलीस खात्याच्या अकरा पोलिसांना वीर मरण आले आहे.

corona virus latest

तरी मुंबई पोलिसांतर्फे एक आणखी एक अभिमानास्पद गोष्ट घडली आहे ती म्हणजे पोलिस नाईक रेहाना नासीर शेख बक्कल नंबर 00549 यांच्या रूपाने इतिहासात नोंद झाली आहे.

police Rihana shaikh

मुंबईतील नायगाव येथे डब्ल्यू टू कंपनीच्या महिला कारकुन पदी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस नाईक रेहाना शेख यांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्ह्यातील ज्ञानाई माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना भेटवस्तू व खाद्यपदार्थ पाठवले होते तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचावासाठी हॅन्ड ग्लोज मास्क सॅनिटयझर पाठवले होते त्यावेळी विद्यार्थ्यांनी व शालेय प्रशासनाने पोलीस नाईक रेहाना शेख यांच्या मुलीला व्हिडिओकॉल द्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

police Rihana shaikh

दरम्यान या विद्यार्थ्यांचा घरचा अडचणी व शिक्षणाची जिद्द लक्षात ठेऊन रेहाना शेख यांनी पन्नास विद्यार्थ्यांना दत्तक घेतले उज्ज्वल भारताचे नागरिक घडविण्याच्या दृष्टीने पोलीस नाईक रेहाना शेख यांनी घेतलेल्या निर्णयाचे ज्ञानाई माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आनंदी देवकर कोळी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष महादेव बुवा शहाबाजकर यांनी आभार मानले निश्चितच या पन्नास विद्यार्थ्यांना दत्त घेतल्यामुळे त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होतील व एक भारताचे चांगले नागरिक घडविण्याचा उद्देशाने एक पाऊल पुढे टाकले गेले आहे. अशाच काही अभिमानास्पद कार्यामुळे मुंबई पोलिसांचे नाव हे इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिले जाईल हे मात्र नक्की…..
माहिती आवडल्यास share नक्की करा…


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *