अभिनय क्षेत्रात काम करत असताना एखाद्या कलाकाराकडे आणखीन काही टॅलेंट असेल तर त्यांच्या फॅन्ससाठी एक मेजवानीच असते. बॉलीवूड मध्ये अनेक दिग्गज कलाकार ज्यांनी अभिनयासोबतच गायनाला देखील महत्त्व दिले. अमिताभ बच्चन सलमान खान आयुष्यमान खुराना आलिया भट श्रद्धा कपूर असे अनेक उदाहरण देता येतील.
मराठी चित्रपट सृष्टीत देखील प्रशांत दामले, सचिन पिळगावकर, आर्या आंबेकर, केतकी माटेगावकर असे अनेक कलाकार अभिनयासोबत गाणीदेखील उत्तम प्रकारे गाताना दिसतात. झी मराठीवर काम करणाऱ्या अभिनेत्री पैकी रात्रीस खेळ चाले मधील शेवंता, माझा होशील ना मधील अभिनेत्री गौतमी देशपांडे या काही अभिनेत्री उत्तम आवाजात गाताना दिसतात. तुला पाहते रे मध्ये सोनियाचे पात्र साकारणाऱ्या पौर्णिमा डे हिने गायलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
पौर्णिमा अभिनयाप्रमाणेच गायनात देखील परिपक्व आहे. तीने यापूर्वीही अनेक गाणे गाऊन सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तीचा आवाजाला ऐकुन ती एक प्रोफेशनल सिंगर असेल, असेच वाटते.
सध्या तिने सैराट चित्रपटातील “आत्ताच बया का” या श्रेया घोषाल ने गायलेल्या गाण्याला उत्तमरित्या गायले आहे. संगीत नसताना देखील तिने हे अवघड गाणे खूपच गोड आवाजात गायले आहे.
पाहा व्हिडिओ :
आवाज आवडला वर दिलेल्या सबस्क्राईब वर क्लिक करा..