झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिके पैकी एक “तुझ्यात जीव रंगला” या मालिकेने यशाची अनेक शिखरे गाठली. या मालिकेत अनेक बदल प्रेक्षकांना पाहायला मिळाले. ज्यात लाडूची एन्ट्री, राणाचा मृत्यू, नंदिताचे निर्गमन व आता राणाच्या मुलीचे आगमन. या सर्व बदलांमुळेच मालिकेला नेहमीच यश प्राप्त झाले.
तुझ्यात जीव रंगला मालिकेत काही महिन्यांपूर्वी राणाची मुलगी राजलक्ष्मी तिचे आगमन झालेले दाखवण्यात आले होते. राहण्यासारखेच रांगोळी बोलल्यामुळे ही चिमुरडी अल्पावधीतच प्रेक्षकांना आवडू लागली. राजलक्ष्मी चे खरे नाव नाव “वाग्मी शेवडे” आहे. वाग्मी आता 9 वर्षाची झाली असून आज म्हणजेच 23 मे ला तिचा वाढदिवस आहे. वाग्मीचे कुटुंब मूळचे साताऱ्याचे अजून ते कामानिमित्त मुंबईत राहतात.
वाग्मीचे वडील अमेय शेवडे यांनी कोथरूड एमआयटी महाविद्यालयांमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले असून ते हल्ली बर्टन मध्ये सीनियर टेक्निकल प्रोफेशनल पदावर काम करतात. वाग्मीची आई तेजस्विनी शेवडे यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. तीच्या आईने देखील तुझ्यात जीव रंगला मालिकेत काम केले आहे. ज्यावेळी राजलक्ष्मी एका शिबिरात दाखल होते या शिबिराचे सूत्र ज्या महिलेकडे दिलेले असते, तीच राजलक्ष्मीची खरी आई आहे.
वाग्मीची छोट्या पडद्यावरील ही पहिलीच मालिका आहे. परंतु तिने शालेय शिक्षण घेत असताना अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला असते. झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांच्या देखील भूमिका तिने उत्तमरित्या साकारल्या आहेत. राजलक्ष्मी ला तीच्या भावी आयुष्यासाठी आणि करीयर साठी खूप खूप शुभेच्छा. तसेच, तिला मर्द मराठी तर्फे वाढदिवसाच्या देखील हार्दिक शुभेच्छा.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा.