“व्हिडीओ पाहण्यासाठी खाली जा”
अभिनय क्षेत्रात अनेक कलाकार असे आहेत ज्यांना अभिनयाप्रमाणेच दुसरेही काही तरी टॅलेंट असते. अभिनयातील कौशल दाखवीत असतानाच दुसरे टॅलेंट ही त्यांची आवड बनून जाते. कोणामध्ये कविता लिहण्याची, कोनामध्ये चित्र काढण्याची तर कोणामध्ये सुरेख आवाजाची प्रतिभा असते.
“माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेत शनयाचे पात्र साकारणाऱ्या “रसिका सुनील” तिच्या मध्ये देखील एक लपलेले टॅलेंट आहे. मालिकेत तिने पहिल्यांदा शनयाचा अभिनय उत्तमरित्या केला होता. नंतर तीला परदेशी एका कोर्स साठी जावे लागले, परंतु ईशा केसकरने मालिका सोडल्यानंतर तीला परत मालिकेत बोलवण्यात आले.
शनया अभिनयाप्रमाणेच गायनात देखील परिपक्व असल्याचे तिच्या आवाजावरून कळते. तीने लहानपणी गायनाचे धडे घेतले होते. परंतु नंतर अभिनयाकडे लक्ष केंद्रीत केल्याने गायनाकडे दुर्लक्षित झाले होते. परंतु शनयाने मागे एका वेब सिरीज साठी गाणे गायले होते. तसेच मालिकेतील तीची मैत्रीण अदिती द्रविड हिच्यासोबत तीचा “यू अँड मी” नावाचा एक अलबम देखील अाला होता.
कलाकार क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत, जे अभिनयासोबतच गायनाकडे देखील लक्ष देतात. मराठी सोबतच बॉलीवूड मध्ये देखील असेच बरेच उदाहरण देता येतील. सलमान खान, अमिताभ बच्चन, श्रद्धा कपूर असे बरेच कलाकार गायन उत्तम प्रकारे करतात. रात्रीस खेळ चाले मधील शेवंता देखील उत्तम प्रकारे गाते. असो रसिकाच्या रुपात मराठी चित्रपट सृष्टीला एक बहुगुणसंपन्न अभिनेत्री लाभली असेच म्हणता येईल.
पाहा व्हिडिओ :