काल 29 एप्रिल रोजी इरफान खान या अभिनेत्याचे कॅन्सरमुळे निधन झाले तर आज 30 एप्रिल रोजी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचेदेखील कॅन्सरने निधन झाले. या दोन्ही दिग्गज अभिनेत्यांच्या जाण्यामुळे चित्रपट सृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. अशातच सध्या लॉक डाऊन चालू असल्याने अनेक मोठ्या कलाकारांना त्यांच्या अंत्यविधीला देखील जाणे शक्य झाले नाही.
इरफान व ऋषी कपूर यांचे काही नातेवाईक परराज्यात व विदेशात असल्याने त्यांना अंत्यविधीसाठी देखील यायला जमले नाही. इरफान खान यांचे अंत्यविधी देखील काही मोजक्याच लोकांनी मिळून पार पडले होते. ऋषी कपूर यांच्या अंत्यविधीसाठी देखील काही मोजकेच सेलिब्रिटी आलेले दिसत होते.
रिशी कपूर यांच्या अंत्यविधीला सर्व कपूर कुटुंबीय तसेच अभिषेक बच्चन, सैफ अली खान, आलिया भट असे काही कलाकार देखील दिसले. ऋषी कपूर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले असताना एका फोटोमध्ये आलिया भटच्या हातात मोबाईल दिसला. ज्यावरून काही लोकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ती फोटो किंव्हा व्हिडिओ शूट करीत असल्याचे वाटत होते.
परंतु, आलिया मोबाईल द्वारे फोटो वगैरे काही काढत नव्हती, तर ती ऋषी कपूर यांच्या मुलीला व्हिडिओ कॉल करून तिच्या वडिलांचे शेवटचे दर्शन घडवीत होती. हा व्हिडिओ कॉल करताना आला देखील अश्रू आवरता आले नाहीत. ऋषी कपूर यांची मुलगी रिधिमा ही विवाहित असून ती दिल्ली येथे राहते.
त्यानंतर तिला आपल्या वडिलांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सरकार कडून स्पेशल परमिशन घ्यावी लागली. त्यामुळेच रिधिमा आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी वेळेवर उपस्थित राहू शकली.
माहिती share नक्की करा