ऋषी कपूर यांचा तो व्हिडिओ मृत्यूच्या आदल्या दिवशीचा नव्हता.. वाचा सत्यता

May 3, 2020 , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

30 एप्रिल 2020 रोजी बॉलीवूड चे महान अभिनेते ऋषी कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कपूर परिवारासाठी तो एक मोठा धक्काच होता. ऋषी कपूर यांच्या निधनाची सर्वत्र चर्चा झाली. सोशल मीडियावर देखील त्यांच्या या निधनाच्या अनेक वार्ता व्हायरल होताना दिसल्या.

rishi kapoor viral video

ऋषी कपूर यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर त्यांची शेवटची व्हिडिओ म्हणून अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसल्या. थाळी वाजवतानाचा व्हिडिओ, दवाखान्यात एका मुलाला चांगले गाणे म्हटले म्हणून आशीर्वाद देतानाचा व्हिडीओ, अशी व्हिडीओ त्यांचा शेवटचा व्हिडिओ असल्याचे दावा खूप जणांनी केला.

rishi kapoor viral video
परंतु दवाखान्यातील जो व्हिडिओ होता, ज्यात एक मुलगा ऋषी कपूर साठी गाणं म्हणत आहे, तो व्हिडिओ मृत्यूच्या आदल्या रात्रीचा नव्हता हे स्पष्ट झाले आहे. तो व्हिडिओ 29 एप्रिलचा नसून 4 फेब्रवारी 2020 रोजीचा आहे. त्यावेळेस ऋषी कपूर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ॲडमिट केल करण्यात आले होते. तेव्हा दवाखान्यातील धीरज कुमार सानू नावाच्या एका मुलांने त्यांच्यासाठी “तेरे दर्द से दिल आबाद रहा” हे गाणं गायले होते. ऋषी कपूर यांनी त्याला आशीर्वाद देखील दिला होता. हा व्हिडीओ त्या मुलाने त्याच वेळी युट्युब ला देखील अपलोड केला होता.

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *