महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज 26 मे रोजी 75 वी जयंती. विलासराव यांचा प्रवास हा सरपंच पद ते मुख्यमंत्री पर्यंतचा प्रवास होता.सदा हसतमुख असणारा चेहरा आपल्यात नाही हे अजूनही विश्वास बसत नाही. त्यांची आज भासणारी कमतरता कोणीच भरून काढू शकत नाही.
रितेश नेहमीच आपल्या वडिलांच्या आठवणीना सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा देत असतो. यावेळी रितेशने शेअर केलेला फोटो अनेकांचे डोळे पाणावणारा आहे. रितेश वडिलांच्या जयंतीनिमित्त याने एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. विलासरावांच्या पोषाखाला बिलगून रितेश त्यांचं अस्तित्व जाणवून घेताना दिसत आहे.
“अभी मुझमे कही बाकी है थोडीसी जिंदगी” या गाण्याच्या पार्श्वभूमीवर रितेशने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या अखेरीस विलासरावांची तस्वीरही दिसते. तर रितेश आणि विलासरावांचा एक पाठमोरा फोटोही यामध्ये आहे. रितेशने हा व्हिडीओ शेअर करताना तुमची नेहमी आठवण येते, असं लिहिलं आहे.विलासराव देशमुख यांना त्यांच्या समर्थकांनी देखील आदरांजली वाहिली आहे.
माहिती आवडल्यास share नक्की करा.