कोरोनाव्हायरस च्या प्रादुर्भावाने छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील सर्वच कलाकार घरीच थांबून आहेत. जरी घरीच राहावे लागत असले तरी काही कलाकार घरी बसूनच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. यामुळे प्रेक्षकांसाठी घरी बसूनच उत्तम करमणूक होत आहे.

shakarshan poem

मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी ही पण सध्या घरीच बसून आपल्या फॅन्स साठी एक उपक्रम चालवताना दिसून येत आहे. “खजिना – कविता आठवणीतल्या, साठवणीतल्या, पुस्तक आणि बरेच काही..” हा उपक्रम स्पृहा तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून चालवताना दिसत आहे. या उपक्रमाव्दारे स्पृहा अन्य मराठी कलाकारांसोबत इंस्टाग्राम वरून लाईव्ह जाते. लाईव्ह येऊन कविता व अन्य विषयावर भाष्य केले जाते.

shakarshan poem

एके दिवशी स्पृहा च्या या उपक्रमात संकर्षण कऱ्हाडे हा मराठी अभिनेता लाईव्ह अाला. आम्ही सारे खवय्ये फेम संकर्षण ने धमाल मस्ती केली. संकर्षण हा मूळचा परभणीचा आहे. त्याने सध्याच्या कोरोनाच्या सध्याच्या परिसथिती बद्दल मराठवाड्यातील भाषेत उत्तम कविता लिहिली. ही कविता सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे..
पाहा व्हिडिओ :


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *