भारतात कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून लॉक डाऊन सुरू आहे त्यामुळे बहुतांश सर्वच लोकांची कामे बंद झालेली आहेत व जे काही साठवून ठेवलेले पैसे होते तेही या लॉकडाउनच्या काळात वापर केल्यामुळे संपुष्टात आलेले आहे व आता बहुतांश लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि याउपरही काही लोकांवर बेरोजगारीची ही संकट ओढवले आहे.

sonal vengurlekar

sonal vengurlekar   गेल्या काही दिवसापासून मालिका व चित्रपट बंद असल्यामुळे या मालिकेत किंवा चित्रपटात काम करणारा कामगार वर्ग तसेच कर्मचारी वर्ग बेकार झालेले आहे त्यांना मोठे अभिनेते मदत करत आहेतच परंतु काही अभिनेते असे आहे जे कामगारांचे राशन पण भरत आहेत.

sonal vengurlekar

sonal vengurlekar   बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अक्षय कुमार आमिर खान सलमान खान यांनीदेखील त्यांच्या परीने सर्वतोपरी मदत करीत आहेत चित्रपट सृष्टी काही कलावंत सोडले तर खालच्या पातळीवर काम करणारे कामगार वर्ग ज्युनियर आर्टिस्ट इत्यादी यांना मिळणारे मानधन देखील कमी आहे.

sonal vengurlekar

अश्याप्रकारे एक फटका सोनल वेंगुर्लेकर या अभिनेत्री ला बसला आहे.सोनल वेंगुर्लेकर ने साम दाम दंड भेद,लाल इशक,ये रिशता क्या कहलाता है यासारख्या मालिका मधून काम केले आहे.तिच्याजवळ आज वर जी काही रक्कम शिल्लक होती, त्यामध्ये तिने तिचा प्रपंच चालविला. परंतु यापुढील महिन्यात घर चालवण्यासाठी देखील तिच्याकडे पैसे नाहीत .यावर दिग्दर्शकानेही तिला पैसे देण्यास नकार दिला .

sonal vengurlekar

यावर तिचा मेकअप मॅन पंकज गुप्ता यांनी मदतीचा हात पुढे केला.विशेष म्हणजे त्या मेकअप मॅन ची बायको गर्भवती असताना देखील त्यांनी मदत केली. “असे म्हणाले की माझ्याकडे 15000 रु आहेत ते तुम्ही घ्या व माझ्या पत्नीच्या डिलिव्हरीच्या वेळेस परत करा ” हे पाहून धक्का बसला.कारण ज्यांच्याकडे माझे हक्काचे लाखो रुपये अडकलेत ते आता माझा फोन उचलत नाहीयेत.

sonal vengurlekar

मला सोशल मीडियावर ब्लॉक करत आहेत. केवळ पैसा हा मुद्दा नाहीए. तर त्यामागची भावना महत्वाची आहे. अशा वेळी डायरेक्टर ने मदत करणे गरजेचे असते. परंतु सोनालचा मेकअपमॅन पंकज गुप्ता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य समजून मदत करण्यास तयार झाले. यामुळेच श्रीमंत लोकांनी आता मनाची श्रीमंती दाखवण्याची वेळ आली आहे, असेच म्हणावे लागेल.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *