अभिनय क्षेत्रात अनेक कलाकारांचे प्रेम प्रकरण जास्त काळ टिकून राहू शकत नाही. काही कलाकार अगोदरच सांगून टाकतात, तर काहींचे मीडियासमोर लपून राहत नाही. नेहा पेंडसे हीचा मागे विवाह झाला. आता आणखीन एका मराठी अभिनेत्रीने साखरपुडा झाल्याचे स्वतः उघड केले. त्या अभिनेत्रीचे नाव आहे सोनाली कुलकर्णी.
सोनाली कुलकर्णी हीचा आज वाढदिवस आहे. हिने आपल्या वाढदिवशी एका मुलासोबत फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाल्याचे स्पष्ट केले. या अभिनेत्रीने 2 फेब्रुवारी रोजी कुणाल बेनोदकर यादी व्यक्तीशी साखरपुडा केला आहे. कुणाल हा पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असून तो दुबईमध्ये जॉब करतो. खुद्द सोनालीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून या दोघांनी दोन फेब्रुवारी रोजी साखरपुडा केल्याचे स्पष्ट केले. सोनालीने साखरपुड्याचे काही फोटो देखील आपल्या फॅन्ससाठी शेअर केले आहेत.
मराठीतील अप्सरा म्हणून ओळख असणारी सोनालीने नटरंग, हिरकणी, मितवा असे अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. अभिनयासोबतच सोनाली एक उत्तम डान्सर आहे हे देखील सर्वांना माहिती आहे. नटरंग चित्रपटातील “मला जाऊ द्या ना घरी” या गाण्यावरील डान्स प्रेक्षकांना खूपच आवडला होता.
यापूर्वीही सोनालीने दोन फेब्रुवारी रोजी एक एडवेंचर व्हिडीओ पोस्ट केला होता ज्यात ती कुणाल सोबत दिसली होती. पण त्यावेळी तिने स्पष्ट सांगितले नव्हते. परंतु आज तिने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला व आपल्या जोडीदाराबद्दल स्पष्ट केले. असे ऐकण्यात येत आहे की, दोघे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा