कोरोनाव्हायरस मुळे सगळीकडे लॉकडाऊन चालू आहे. अशातच अभिनय क्षेत्रातील सर्व कलाकार घरीच अडकून राहिले आहेत. या लॉकडाऊन काळात अनेक कलाकार एकमेकांना वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस देताना दिसत आहेत. घरी बसून हे चॅलेंजेस पूर्ण करण्याचे आव्हान केले जातात.
अभिनय क्षेत्रातील कलाकारा सोबतच सामान्य जनता आहे काहीना काही सोशल मीडियावर चॅलेंजेस देत असतात. झी मराठीवरील मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतील अभिनेत्री अमृता धोंगडे हिने पण एक नवीन चॅलेंज स्वतःच्या मोठ्या बहिणीला दिले होते. हे चॅलेंज थोडेसे वेगळ्या प्रकारचे होते.
मिसेस मुख्यमंत्री मालिकेत आपल्या बेधडक अभिनयाने अमृताने सर्वांची मनं जिंकले. सुमी नावाचे पात्र तिने अत्यंत उत्तमरित्या साकारले. अमृताने तिची मोठी बहीण पुजा धोंगडे ला कडूलिंबाचा रस पिण्याचे चॅलेंज दिले. सोबतच तो रस पिल्यानंतर चेहऱ्यावर हास्य असले पाहिजे असे देखील चॅलेंज दिले. हे चॅलेंज दोघींनी उत्तमरित्या पूर्ण केले.
पाहा व्हिडिओ :
Subscribe करा: