चांगल्या माणसासोबतच नेहमी वाईट घडत असते, हे वाक्य आपण नेहमीच ऐकत असतो. याबाबतीत स्वामी समर्थ महाराजांनी एक गोष्ट सांगितली. या गोष्टीमध्ये मनुष्यांच्या या प्रश्नांचे उत्तर दिले. एका नगरात दोन मनुष्य राहायचे. त्यातील एक माणूस व्यापारी होता. तो देवाला खूप मानायचा. रोज मंदिरात जाऊन पूजा आरती करायचा. आपला काम धंदा पण तो प्रामाणिकपणे करायचा.

swami samarth story

दुसरा माणूस नास्तिक प्रवत्तीचा होता. लोकांचा छळ करणे दुसऱ्यांना त्रास देणे यातच त्याला समाधान मिळायचे. तो देवाला मानत जरी नसला तरी मंदिरात जाऊन दानपेटी मधील पैसे चोरी करायचा. एके दिवशी मोठा पाऊस पडत असताना मंदिरात कोणी नसलेलं पाहून त्याने मंदिरातील दानपेटी चोरी केली. थोड्या वेळाने तो व्यापारी नेहमीप्रमाणे मंदिरात पूजा करायला गेला. दानपेटी मंदिरात नसल्याने त्याने आरडाओरड केली. परंतु लोकांनी त्याच्यावरच संशय घेतला. त्याला लोकांनी खूप काही वाईट बोलले. मी चोरी केली नाही हे व्यापारी ओरडून सांगत होता, परंतु त्याचे कोणीच ऐकले नाही. व्यापाऱ्याला या गोष्टीचे खूपच वाईट वाटले. तो मंदिरातून बाहेर पडला व वाटेतून चालत असताना त्याला वाटेत एका वाहनाने धडक दिली. मात्र तो तसेच उठून चालत घरी गेला. तो चोर मात्र दानपेटी घेऊन पळून जात असताना वाटेत त्याला आणखीन काही पैसे सापडे व तो आनंदी होवून पळून गेला. त्या चोराबद्दल नंतर व्यापाऱ्याला कळले होते.

swami samarth story

काही वर्षांनंतर दोघांचाही मृत्यू झाला. यमराज दोघांना एकत्र सोबत घेऊन जात असताना व्यापाऱ्याने यमराजला विचारले, मी नेहमीच चांगलं वागलो होतो, देवाची भक्ती पण कायम मनात ठेवली होती, मग त्या दिवशी माझ्यासोबत असे का घडले होते. आणि हा माणूस नेहमी दुसऱ्याचे वाईट करायचा, मग त्याचे का वाईट झाले नाही. मलाच का इतके दुःख मिळाले?

swami samarth story

यमराज उत्तरले, त्यादिवशी खरेतर तुझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस होता. परंतु तुझी भक्ती आणि तुझ्यातील माणुसकी यामुळेच तू गाडी समोर येऊन देखील जिवंत राहिलास. आणि या चोराचा त्यादिवशी राज योग होता. त्याच्या वाईट कामामुळे थोड्याशा पैशासाठी त्याला राज योग भेटू शकला नाही. हे ऐकून व्यापारी देखील समाधानी झाला.

तात्पर्य : आपण केलेल्या चांगल्या कामाचे फळ देऊन नेहमी चांगल्या रुपाने देत असतो. तसेच आपण केलेल्या वाईट कामाचे फळ देखील वाईटच मिळत असतात. त्यामुळे चांगले काम करा, देवावर विश्वास ठेवा व माणुसकी जपा.

कहाणी आवडली तर नक्की शेयर करा


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *