लग्नापूर्वी मुली आपल्या होणारा पती कसा असावा हे ठरवीत असतात. काही महिलांना अगदी हवा तसाच नवरा मिळत असतो, तर काहींच्या स्वप्नांचा भ्रमनिरास होतो. परंतु बहुतेक महिलांना खालील पाच गोष्टी आपल्या नवऱ्याकडून मिळाव्या, असेच वाटत असते.
5. कपाळावर किस : पुरुषांनी रोमँटिक असणे म्हणजेच संभोग किंवा इतर गोष्टी करणे असे नसते. रोमान्स पेक्षा महिलांना आपल्या पतीने प्रेमाने कपाळावर किस करणे, हे जास्त आवडत असते. कपाळावर किस करणे, हे खऱ्या प्रेमाचे लक्षण मानले जाते.
4. बाहेर फिरायला घेऊन जाणे : दैनंदिन घरगुती कामामुळे प्रत्येक महिलांना काही दिवसानंतर आपोआप कंटाळा येऊ लागतो. यामुळे आठवड्यातून एकदा तरी आपल्या पतीने बाहेर कुठेतरी फिरायला न्यावे असे अनेक महिलांना वाटत असते.
3. घरकामात मदत : प्रत्येक महिलांना आपल्या पतीने घरातील एखाद्या कामांमध्ये कधीतरी मदत करावी असेच वाटत असते. ज्यावेळी एखादा पती घरातील कामात मदत करतो, त्यावेळी महिलांना वेगळ्याच प्रकारचा आनंद होत असतो.
2. गिफ्ट देणे : ज्यावेळी एखाद्या व्यक्ती आपल्या पत्नीला तिला काही न सांगताच तिच्यासाठी काहीतरी खरेदी करून आणतो, त्यावेळी पत्नीचा आनंद गगनात मावत नसतो. त्यामुळे कधीतरी पतीने आपल्या पत्नीसाठी छोटीशी का होईना गिफ्ट रूपात काहीतरी दिले पाहिजे.
1. माहेरच्या लोकांचा सन्मान करणे : कोणतीही मुलगी जड अंतकरणाने आपले घर सोडून दुसऱ्याच्या घरी लग्न करून जात असते. अशावेळी माहेरच्या माणसां प्रति तिचे प्रेम आणखीनच वाढत असते. त्यामुळे आपल्या पतीने माहेरच्या सर्वांनबाबतीत आदराने राहिले पाहिजे, असेच प्रत्येक पत्नीला वाटत असते.
वरील पाच गोष्टी जर प्रत्येक पतीने केल्या तर कोणतीही महिला स्वतःला नशीबवान समजेल. माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा.