कोरोना व्हायरसवर नियंत्रण आणण्यासाठी भारतीय सरकारने घेतलेल्या निर्णयांची जगभरातून कौतुक केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी योग्य निर्णय घेतल्याने भारतात कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात राहिला आहे.
22 मार्च रोजी एक दिवसाचा जनता कर्फ्यू राबविल्यानंतर नरेंद्र मोदींनी लॉक डाऊनचे दोन टप्पे राबविण्यात आले. या काळात अत्यावश्यक दुकाने सोडून सर्व दुकाने बंद करण्यास सांगितले. परंतु ज्यांना दारु बियर पिल्याशिवाय चैन पडत नाही अशा लोकांना याचा खूप त्रास झाला. सोशल मीडियावर दारू बियर ची दुकान चालू करावेत, अशी अनेकांनी मागणी केली होती.
तळीरामांचा विचार करीत केंद्र सरकारला दारु बियर चे दुकाने चालू करावी लागली. तसेच तिन्ही झोनमध्ये ही दुकाने चालू करण्यास सांगितली. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय 4 मे पासून देशभरात राबवण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय चुकीचा ठरला, असेच आजची परिस्थिती पाहून वाटत आहे.
महाराष्ट्रातील लातूर शहरातील एक व्हिडिओ वायरल होताना दिसत आहे. ज्यात दारूच्या दुकानासमोर एक एक किलोमीटर पर्यंत रांगा लागल्याचे दिसून येत आहे. इतके दिवस दारू विना काढलेल्या लोकांनी सकाळी दुकान उघडण्याच्या अगोदरच दुकानासमोर गर्दी केली होती. ही परिस्थिती पाहून सरकार घेतलेल्या निर्णयात बदल करेल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
माहिती आवडली तर नक्की शेअर करा.