1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आज पर्यंत पाकिस्तान नेहमीच काश्मीरची मागणी करत असतो. परंतु भारताकडून त्याला वेळोवेळी प्रत्युतर मिळाले आहे. 1965, 1971 व कारगील युद्ध 1999 अशा प्रत्येक वर्षी भारताने पाकिस्तानला युद्धात हरवून धूळ चारली.
गेल्या महिन्यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने काश्मीर बॉर्डर जवळ येऊन कश्मीर ला मिळवणारच अशा घोषणा दिल्या होत्या. तसेच त्यांनी कश्मीर मधील लोकांना नरेंद्र मोदींकडून खूप त्रास मिळतो असे देखील म्हटले होते. त्यावर अनेक भारतीय क्रिकेटपटूने त्याला चांगलेच सुनावले होते.
मागील काही दिवसांपासून वारंवार इकडेतिकडे फिरणाऱ्या शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या फॅन्स मध्ये चिंता निर्माण झाली आहे. शाहिद आफ्रिदी मराठी काही दिवसांपासून पाकिस्तानात अन्नधान्याचे वाटप करत होता.
शाहिद आफ्रिदीने स्वतः ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. “मला गुरुवारपासून बरे वाटत नव्हते. माझे अंग पण खूप दुखत होते. मला कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह अाला असून मी लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करा.”