बॉलिवूड मध्ये काही वर्षांपूर्वी अनेक चित्रपटात काही बालकलाकार दिसले होते. त्यातील काही बाल कलाकार आजही प्रेक्षकांना आवडतात. त्यापैकी काही बाल कलाकार आता इतक्या वर्षानंतर कसे दिसतात, हे पाहुयात.
1. मालविका राज(छोटी करीना)- कभी खुशी कभी गम : या चित्रपटात करीना कपूर हिच्या लहानपणीचा अभिनय केला होता. चित्रपटात अत्यंत गोड चेहरा आणि उत्तम अभिनय करणारी ही अभिनेत्री आता 26 वर्षाची झाली आहे. मालविकाने नंतर अनेक तमिळ व इतर भाषेतील चित्रपटात काम केले आहे.
2. जिब्रान खान (शाहरुखचा मुलगा)- कभी खुशी कभी गम :
या चित्रपटात शाहरुख काजोलच्या क्रिश या मुलाचा अभिनय करणारा जिब्रान खान आता 26 वर्षाचा झाला आहे. त्याने नंतर “रिश्ते” चित्रपटात अनिल कपूर यांच्या मुलाचा देखील रोल साकारला होता.
3.अहसास चन्ना(शाहरुखचा मुलगा)- कभी अलविदा ना केहना : तुम्हाला ऐकुन धक्का बसेल की शाहरुखच्या मुलाचा अभिनय करणारा हा बालकलाकार मुलगा नसून मुलगी आहे. तीच खरे नाव अहसास चन्ना हे असून तीने “माय फ्रेंड गणेशा” या चित्रपटात देखील मुलाचीच मुख्य भूमिका साकारली होती. अहसास चन्ना आता 20 वर्षाची असून तिने आणखीन बऱ्याच चित्रपट व मालिकेत काम केले आहे.
4. सना सईद (अंजली)- कुछ कुछ होता है :
बॉलीवुड मधील हिट चित्रपटांपैकी एक असलेला कुछ कुछ होता है हा एक चित्रपट आहे. या चित्रपटात लहान अंजलीचा अभिनय करणारी बालकलाकार आता खूपच हॉट दिसत आहे. सना आता 31 वर्षाची झाली असून तीने “स्टूडेंट ऑफ द इअर” चित्रपटामध्ये देखील अभिनय केला होता. तसेच, कलर्स वरील खतरों के खिलाडी या शो मध्ये देखील ती सहभागी झाली होती.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा.