व्हिडिओ साठी खाली पाहा :
चीनच्या वाढत्या कुरापती मुळे संपूर्ण जग परेशान झाले आहे. दहशतवाद्यांचे केंद्र असलेल्या पाकिस्तानला सतत मदत करीत चीन भारताविरुद्ध द्वेष दाखवित असतो. कोरोना सारखा भयंकर रोगाची सुरुवात ही चीनमधून झाल्याने जगातील अनेक देश चीन विरोधी भूमिका घेताना दिसत आहेत.
भारतातील लोकांमध्येही चीन बद्दल द्वेष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. टिक टॉक या चायनीज ॲप ला डिलीट करण्याच्या काही पोस्ट्स सोशल मीडियावर व्हायरल होत गेल्या. तसेच चिनी उत्पादनांचा देखील सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.
तसेच चीन आणि भारताच्या सीमेवर युद्धजन्य परिस्थिती चालू आहे. दोन्ही देशात झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. यामुळे भारतातील लोक खूपच रागात असलेले दिसत आहेत. सर्वत्र चीन विरोधात निदर्शने करण्यात येत आहेत.
अशातच चिनी वस्तूंचा विरोध म्हणून गुजरातच्या सुरत मध्ये एका व्यक्तीने त्याच्या घरातील मेड इन चायना असलेला टीव्ही चक्क फोडून टाकला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे. त्या गृहस्थांनी घराच्या बाल्कनी मधून स्वतःचा टिव्ही वरुन खाली फेकला व नंतर सर्वांनी चीन विरोधात घोषणा देखील दिल्या. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेयर करा.
पहा व्हिडिओ :
माहिती share नक्की करा…