जगभरात कोरोना व्हायरसचा सर्व जण सामना करीत आहेत. या व्हायरस मुळे सर्वत्र मृत्यूचे तांडव चालू आहे. मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे प्रशासनाला कठीण होत चालले आहे.

sk

22 मार्च पासून अचानक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक श्रमिक कामगारांना त्यांच्या गावी परत जाता आले नव्हते. त्यामुळे त्यांना आहे तिथेच अडकून राहावे लागले. अशातच काम नसल्याने पोट भरण्यासाठी अन्नधान्य नसल्याने त्यांना पायीच गावी परत जाण्याची वेळ आली. शेकडो किलोमीटर चालून काही जण आपापल्या गावी परत गेले. या सगळ्याला पाहून प्रशासनाने सरकारी वाहनांचा सोय केली.

प्रशासनाच्या या निर्णयाला थोडासा विलंब झाला असेच काहीतरी चित्र दिसून येत आहे. उपासमारीमुळे कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. अशातच एक्स व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होताना दिसून येत आहे, ज्यात एका महिलेचा रेल्वे स्टेशन वरच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्या महिलेला तिचा मुलगा पांघरूण घालत असल्याचे त्या व्हिडिओ मधून दिसून येत आहे.

त्या महिलेच्या मृत्यूनंतर शाहरुख खान ने त्या घटनेची दखल घेतली. त्याने त्या परिवाराला सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे व तसेच त्यांना दोन लाख रुपये दिल्याची देखील बातमी आहे. या निर्णयाबद्दल शाहरुखची सर्वत्र कौतुक होत आहे.

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *