2020 हे वर्ष सर्वच बाबतीत वाईट वर्ष समजले जात आहे. या वर्षात बॉलिवूड मधील अनेक दिग्गज कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. आता आणखीन एका मोठ्या कलाकाराचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. साऊथ भागातील कन्नड इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा यांचे निधन झाले आहे.
स्थानिक वृत्तानुसार चिरंजीवी यांना शनिवारी छातीत वेदना होत होत्या. रविवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि तरी त्यांना बेंगलोर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु, त्याच दिवशी दवाखान्यातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यामुळे साउथ मधील तसेच देशभरातील अनेक फॅन्सना धक्का बसला आहे.
चिरंजीवी हे अभिनेता ध्रुव सरजा याचे मोठे बंधू होते. तसेच चिरंजीवी यांची पत्नी ही देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे व त्यांचे नाव मेघना राज आहे. चिरंजीवी आणि मेघना यांचे आठ वर्षे एकमेकांसोबत प्रेम होते. नंतर त्यांनी 2018 साली विवाह केला होता.
चिरंजीवी यांच्या मृत्यूने तर सर्वांना दुःख झाले आहेच, परंतु त्याहून ही जास्त दुःखद बातमी म्हणजेच त्यांची पत्नी मेघना ही गर्भवती आहे. दोघांनी आपल्या होणाऱ्या बाळासाठी खूप स्वप्ने पहिली होती व दोघे बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक पण होते. त्यामुळे ही घटना ऐकुन आणखीनच हळहळ व्यक्त होत आहे. मृतदेहावर त्यांची पत्नी मेघना रडतानाचा हा व्हिडिओ खूपच दुःखद आहे.
पाहा व्हिडिओ :
माहिती share नक्की करा