पडद्यावर कलाकारांनी एखादा बोल्ड सीन दिला की चित्रपट किंवा मालिका हिट होईल, आजकाल असाच काहीसा समज झाला आहे. कलाकार ही पैशाच्या हव्यासापोटी असे सीन देण्यासाठी तयार होतात. छोट्या पडद्यावरील हिंदी मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने वयाच्या पंधराव्या वर्षीच किसिंग सीन केल्याने तीच्या आईने तिला कानशिलात लगावली होती.
टीव्हीवरील या अभिनेत्रीचे नाव जन्नत जुबैर रहमानी आहे. या अभिनेत्रीने 2010 मध्ये वयाच्या नवव्या वर्षी “दिल मिल गये” या हिंदी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. परंतु, जन्नतला खरी ओळख 2011 मध्ये गाजलेल्या फुलवा या मालिकेने दिली. त्या मालिकेत तिने केलेल्या छोटी फुलवाचे पात्र प्रेक्षकांना खूपच आवडले.
जन्नत ने नंतर अनेक मालिकेत काम केले. 2017 मध्ये जन्नत ने कलर्स वाहिनीवरील “तू आशिकी” या हिंदी मालिकेत “पंक्ती” हे पात्र साकारले होते. मालिकेचा हिरो ऋत्विक अरोरा याच्यासोबत जन्नत ची केमेस्ट्री युवा पिढीला खूपच आवडू लागली. या मालिकेत काही बोल्ड सीन मुळे चांगलाच वाद झाला होता.
मालिकेत कोणतेही किसिंग सीन होणार नाहीत असे करारात जन्नतच्या मम्मीने सांगितले होते. परंतु नंतर दिग्दर्शकांनी बोल्ड सीन करण्याचा निर्णय घेतल्याने जन्नतच्या आईने सेट वर काहीसा वाद देखील केला होतं. असे ऐकण्यात येत आहे की यामुळे जन्नतच्या आई ने जन्नत ला कानाखाली मारले देखील होते. जन्नत ने हीचकी, लव का दी एंड अशा काही चित्रपटात देखील काम केले असून ती एक लोकप्रिय टिक टॉक स्टार देखील आहे.
माहिती आवडली तर शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा.