सुशांत सिंग राजपूत यांनी केलेल्या आत्महत्या मुळे अनेकजण आणखीनही धक्क्यातून सावरले नाहीत. अशातच सुशांत ने आत्महत्या कोणत्या कारणाने केली याबद्दल अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. हसतमुख असणारा सुशांत आत्महत्या करू शकत नाही, असे खूप जणांचे म्हणणे आहे.
बॉलीवूड ची धाकड अभिनेत्री कंगना राणावत हिने अप्रत्यक्षरीत्या सुशांतच्या आत्महत्येला बॉलिवूडला जबाबदार ठरवले आहे. बॉलीवूड ने सुशांतच्या अनेक चित्रपटाला कमीपणा दाखविला असे, कंगनाचं म्हणणं आहे. यापूर्वीही कंगनाने अनेक बेधडक आणि स्पष्ट व्यक्तव्य केले आहेत.
कंगनाने व्हिडिओमध्ये बॉलीवूड वर राग व्यक्त करताना, “सुशांत याच्या कोणत्याही चित्रपटाला कुठलाही आवाज दिला गेला नाही. त्याच्या पदार्पणातील चित्रपट “काई पो छे” या चित्रपटाला देखील त्याला नावाजले गेली नाही. “गली बॉय” सारख्या खराब चित्रपटाला इतक्या वेळ दिले परंतु “छीचोरे” सारख्या चित्रपटाला एकही आवार्ड दिला गेला नाही,” असा आरोप केला.
“मी स्वतः चित्रपटांचे दिग्दर्शन करते, माझ्या सुपरहिट चित्रपटांना बॉलिवूड फ्लॉप ठरवीत असते. बॉलीवूड चे मिडीयावाले चमचे हेदेखील मला येऊन सांगतात की तुझी वाईट वेळ आहे तू आत्ता काहीही बोलू नकोस. जो मुलगा प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे तो मानसिक रित्या अशक्त कसा असू शकतो? सुशांतला देखील असेच मानसिक त्रास देण्यात आला, म्हणून ही आत्महत्या नसून याला खून का म्हणण्यात येऊ नये?”, असा प्रश्न कंगनाने व्हिडिओद्वारे उपस्थित केला आहे.
पाहा व्हिडिओ :