व्हिडिओ साठी खाली पाहा

सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूला तीन महिने उलटले असले तरी त्याच्या मृत्यूचे खरे कारण आणखीन समोर आले नाही. सुशांत च्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांनी बॉलिवूडमधील बड्या कलाकारांवर संताप दाखविला. जुने कलाकार नवीन कलाकारांना चांगली वागणूक देत नाहीत व काही दिग्दर्शक मोठ्या कलाकारांच्या मुलांनाच जास्त संधी देतात असे आरोप चाहत्यांकडून करण्यात आले.

kareena kapoor on sushant


सुशांतच्या बाजूने या प्रकरणात दखल घेताना काही कलाकारांनी बॉलिवूडमध्ये नवीन कलाकारांना तुच्छ दर्जाचे लेखले जाते, असा आरोप केला आहे. मागील काही दिवसात सुशांत सोबत वाईट वागलेल्या प्रसंगाचे काही व्हिडिओ देखील वायरल होत गेले. शाहरुख खान आणि शाहीद कपूर यांनी सुशांतचा एका अवॉर्ड शो मध्ये केलेला अपमानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला.

View this post on Instagram

Fabulous at 40 ❤️❤️❤️ #birthdayvibes🎉

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

आज 40 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या करीना कपूरचा आता या संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. झी कॅफे च्या “कॅफे शॉट्स” या कार्यक्रमात करीनाला हा प्रश्न विचारण्यात आला. तू सारा अली खानला डेट बद्दल काय सल्ला देणार? या प्रश्नाला उत्तर देताना करीनाने सुशांत बद्दल उपदेशून तोंड वाकडे केलेले दिसले.पहा व्हिडीओ..

करीनाने ने सारासाठी असा सल्ला दिला,”तुझ्या पहिल्या हिरोसोबत डेट ला जाऊ नकोस.” हे म्हणताना करीनाने चेहऱ्यावर विचित्र हावभाव दिल्याचे देखील पाहायला मिळाले. साराचा पहिला चित्रपट “केदारनाथ” हा असून त्या चित्रपटाचा हिरो सुशांत सिंग राजपूत हा होता. करिनाच्या वाढदिवशीच हा व्हिडिओ व्हायरल करून सुशांत फॅन्स तीच्यावर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *