व्हिडिओसाठी खाली पहा
काल 6 जून रोजी रायगडावर दरवर्षीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या सोहळ्याला शिवरायांचे वंशज श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती व अन्य काही लोक उपस्थित होते.
6 जून 1964 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रथम शिवराज्याभिषेक करण्यात आला. त्यामुळे दरवर्षी सहा जूनला लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत रायगडावर हा सोहळा पार पडला जातो. शिवरायांवर लहान लेकरं पासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचे प्रेम आहे. याचे उत्तम उदाहरण “तुझ्यात जीव रंगला” मालिकेत लाडूचा अभिनय करणारा “राजवीर” हा होय.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेत लाडू हा पैलवानाची भूमिका साकारताना दिसला होता. खऱ्या आयुष्यात तो पेहलवानी सोबतच एक सच्चा शिवभक्त आहे. कालच्या दिवशी चा त्याचा शिवगर्जना म्हणताना चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लाडूचे खरे नाव राजविरसिंह गायकवाड असून तो कोल्हापूर येथे राहतो. त्याने म्हटलेल्या भक्कम आवाजातील शिवगर्जना च्या त्या व्हिडिओचे सर्वत्र कौतुक होत आहे. लाडू ने आपल्या घराच्या छतावर शिवरायांच्या मुर्तीची पुजा केली व फॅन्ससाठी काही फोटो शेअर केले.
पाहा व्हिडिओ :