कोरोना या जीवघेण्या व्हायरस मुळे संपूर्ण जगाची आर्थिक परस्थिती ढासळली आहे. भारतात देखील हीच परिस्थिती असून मध्यम व गरीब कुटुंबासाठी खूपच बिकट परिस्थिती होत चालली आहे. अशातच एक अभिनेत्री अभिनयासोबतच रिक्षा चालवू लागली, परंतु तरीही जीवन चालत नसल्याने तीने मदतीची हाक मारली आहे.
मुंबईतील मुलुंड भागात राहणारी 28 वर्षीय लक्ष्मी निवृत्ती पंधे अत्यंत गरीब घरातून लहानाची मोठी झाली. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती व चित्रपट व मालिकांमध्ये काम करण्याचे तिचे स्वप्न होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने लक्ष्मी नी अभिनयासोबत रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.
सर्व काही सुरळीत चालू असताना कोरोना व्हायरसने अनेकांचे रोजगार काढून घेतले. अभिनयासोबत रिक्षा मधून येणारे उत्पन्न बंद झाल्याने लक्ष्मी ला घर चालवणे अवघड झाले. त्यातच वाहतूक नियंत्रण पोलिसांकडून ऑटो चालकांना त्रास होत असल्याचा तीने आरोप केला आहे. यामुळे लक्ष्मीने स्वतःच्या आटो मधूनच मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांना मदतीची हात मागितली आहे.
लक्ष्मी ने देवयानी, लक्ष, तू माझा सांगाती अशा अनेक मराठी मालिकेत काम केले आहे. तसेच तीने “मुंबई पुणे मुंबई” या चित्रपटात देखील काम केले आहे. काही महिन्यांपूर्वी लक्ष्मीला ऑटो चालवताना पाहून बोमन हीरानी या अभिनेत्याने कार थांबविली व तीच्या ऑटोमध्ये बसून सेल्फी देखील काढली होती. तिने राज ठाकरेंकडे केलेल्या विनंतीचा हाच तो व्हिडिओ
पाहा व्हिडिओ :
माहिती share नक्की करा….