महाराष्ट्रभर सध्या एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याने सर्वत्र त्याबद्दल चर्चा चालू आहे. जुलै 2019 मध्ये घेतलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल 19 जून रोजी जाहीर करण्यात आला. शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या लातूर पॅटर्न मधील “राजश्री भोसले” या मुलीने लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

latur news latest

एमपीएससी परीक्षा मध्ये राजश्री ने घवघवीत यश मिळविताना महिलांच्या खुल्या प्रवर्गातून राज्यातून 9 वा क्रमांक पटकाविला आहे. जिद्द व चिकाटीने अभ्यास करून तिने नायब तहसीलदार हे पद मिळविले आहे. अभ्यासात सातत्य व स्वतःला नेहमी चालू घडामोडी मध्ये अपडेट ठेवीत तीने अभ्यास केला व हे यश संपादन केले.

latur news latest

राजश्री भोसले ही मूळची किल्लारी जवळील सरवडी या गावची रहिवासी आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना राजश्री ने म्हटले, “पुण्यात जाऊन मी स्पर्धा परीक्षेची तयारी केली, मला यापूर्वी तीन वेळा अपयश मिळाले होते. परंतू तरीही मी हार मानले नाही व पुन्हा नवीन ऊर्जा घेऊन परीक्षा दिली व यश मिळविले.”

latur news latest

पुढे बोलताना तीने म्हटले, “तुम्ही मुलींना संधी द्या, तिच्या पाठीशी उभे राहा. असे केलात तर मुलगी देखील अधिकारी होवू शकते व दोन्ही घराचे नाव उंचावू शकते. सुरुवातीला अपयश येणारच असे गृहीत धरून स्पर्धेत उतरा. म्हणजे अपयश जरी आले तरी ते पचविता येईल.” किल्लारी भूकंपात राजश्रीच्या वडिलाचे निधन झाले होते. बिकट परिस्तिथी मधून तिने नायब तहसीलदार बनून लातूरचे नाव उंचावले हे मात्र नक्की आहे.

माहिती आवडली तर शेयर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *