चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांचे वैवाहिक नाते मरेपर्यंत टिकताना आपण पाहिले आहेत. परंतु काही कलाकारांचे आपल्या जोडीदारासोबतचे नाते जास्त काळ टिकू शकले नाहीत. आज आपण मराठी सिनेजगतातील घटस्फोट झालेल्या कलाकारांबद्दल जाणून घेऊयात.
5. सई ताम्हणकर-अमय गोस्वामी :
मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाने व आपल्या अदा नी युवा पिढीवर छाप पाडणार्या ताम्हणकर चे लग्न झाले होते, हे खूप कमी लोकांना माहिती आहे. सई ताम्हणकर तिने अमेय गोस्वामी यांच्यासोबत 13 डिसेंबर 2015 रोजी लग्न केले होते. परंतु तीन वर्षानंतर काही कारणास्तव दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

4. स्वप्निल जोशी-अपर्णा जोशी :
मराठी इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला स्वप्निल जोशी याचा पण एक वेळेस डिव्होर्स झाला आहे. स्वप्निल याने त्याची महाविद्यालयीन मैत्रीण अपर्णा सोबत विवाह केला होता. परंतु चार वर्षातच दोघे विभक्त झाले. त्यानंतर स्वप्नील ने औरंगाबादच्या लीना आराध्ये सोबत 2011 मध्ये विवाह केला.

3. रेशम टिपणीस-संजीव सेठ :
आपल्या सौंदर्याने व अभिनय कौशल्याने मराठी चित्रपट सृष्टीत नाव कमावणाऱ्या रेशम टिपणीस या अभिनेत्रीचा देखील डिव्होर्स झाला होता. 1993 साली रेशम ने वयाच्या विसाव्या वर्षीच संजीव सेठ या अभिनेत्यासोबत विवाह केला होता. अकरा वर्षे सोबत राहिल्यानंतर दोघांनी 2004मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मराठी बिग बॉस मध्ये रेशमचे राजेश शृंगारपुरे सोबत नाव जोडले गेले.

2. शशांक केतकर-तेजश्री प्रधान :
होणार सुन मी या घरची या झी मराठी वरील मालिकेतील सुप्रसिद्ध जोडी शशांक आणि तेजश्री यांना मालिकेत दरम्यानच एकमेकांवर प्रेम झाले होते. दोघांनी लगेच विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सहा महिन्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. तेजश्री त्याला ज्युनियर आर्टिस्ट असे चिडवत असल्याचे कारण समोर आले होते.
1. पीयूष रानडे – मयुरी वाघ : झी मराठी वरील अस्मिता मालिकेतून प्रसिध्दी मिळवणाऱ्या मयुरी वाघ हिने पीयूष रानडे या अभिनेत्यासोबत विवाह केला होता. परंतु पीयूष याचे अगोदरच अभिनेत्री शमलिका सोबत लग्न झाले होते व दोघे नंतर विभक्त देखील झाले होते. आता पीयूष आणि मयुरी यांच्यात देखील छान संबंध नसल्याचे ऐकण्यात येत आहे.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..