चित्रपट सृष्टीतील कलाकारांचे प्रेम प्रकरण कितीही लपविले तरी मीडियापासून ते लपत नसते. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे अफेअर्स त्यांनी स्पष्ट करण्याअगोदरच फॅन्स पर्यंत माहिती पोचलेले आपण पाहिलं आहे. मराठी कलाकारांचे देखील तसेच काहीतरी आहे. आज आपण काही मराठी कलाकारांच्या गाजलेल्या प्रेम प्रकरणावर माहिती घेऊयात.
1. मानसी नाईक – बघतोय रिक्षावाला फेम मानसी नाईक या अभिनेत्रीने अनेक मराठी आइटम साँग, लावणी ने प्रेक्षकांची मने जिंकली. या अभिनेत्रीने स्वतः तिच्या वाढदिवशी तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा याबद्दल सर्वांना माहिती दिली होती. प्रदीप खरेरा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर आहे. लवकरच ते दोघे विवाहबंधनात अडकण्याची देखील शक्यता आहे.

mansi naik bf

mansi

2. ईशा केसकर :

झी मराठीवरील जय मल्हार या मालिकेत बांधायची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्री ईशा केसकर हिचा प्रियकर रिशी सक्सेना हा अभिनेता आहे. काही दिया परदेस या मालिकेत शिव ची भूमिका साकारणारा ऋषी आणि ईशाची प्रेम कहाणी 4 वर्षापासून आहे. दोघे खुलेआम आपल्या प्रेमाची कबुली सोशल मीडियावर देताना दिसत असतात.

isha

3. अक्षया देवधर
“तुझ्यात जीव रंगला” मधील अंजलीबाई म्हणजेच अक्षया देवधर हिच्या प्रेमप्रकरणाची देखील खूप चर्चा झाली होती. प्रसिद्ध अभिनेता सुयश टिळक याचे आणि अक्षयाचे खूप घट्ट संबंध असल्याचे समोर आले होते. परंतु मागील काही महिन्यांपासून दोघे एकत्र दिसत नसल्याने दोघात फूट पडली आहे का, अशी चर्चा वर्तविण्यात येत आहे. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो देखील केले आहे. दोघे एकत्र जरी सुंदर दिसत असले तरी त्या नात्याबद्दल तेच शेवटी स्पष्ट करतील.

akshaya bf

शिव ठाकरे – वीणा जगताप

बिग बॉस या रियालिटी शोमध्ये प्रत्येक सदस्य काहीतरी गुपित शेअर करताना दिसत असतात. तसेच या शो मध्ये नवीन प्रेम सुरू झालेलं आपण पाहिलं आहे. बिग बॉस-मराठी मध्ये शिव ठाकरे आणि विना जगताप यांची प्रेम कहानी देखील अशीच आहे. घरातच राहून दोघांना एकमेकांवर प्रेम झाले व या प्रेमाची सर्वत्र चर्चा देखील झाली.

माहिती share नक्की करा


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *