व्हिडिओ साठी खाली पहा
जूनचा महिना आला की शाळा सुरू होण्याची व नवीन वर्गात जाण्याची उत्सुकता वाटायची. नवीन पुस्तके नवीन वह्या, नवीन दप्तर या सर्व गोष्टीमुळे उत्सुकतेत आणखीन जास्त भर पडायची. मराठी शाळेत शिकणाऱ्या यांनी तर त्यांचे बालपण अगदी आनंदात जगले असतील.
दहा-पंधरा वर्षांपूर्वी इंग्लिश मीडियम शाळांचे अस्तित्व नव्हते. त्यामुळे पालकांच्या खिशावर देखील ओझे कमी होते. तसेच शाळा ही कमी असल्याने जवळची सर्वच मुले एकाच शाळेत जात असे. आजही अनेक व्यक्ती म्हणतात की इंग्रजी मीडियम पेक्षा मराठी शाळेतील उत्तम शिक्षण व उत्तम संस्कार मिळतात.
मुंबईच्या परळ भागातील आर. एम. भट हायस्कूल ही मराठी शाळा नेहमीच काहीना काही उत्कृष्ट असे करून चर्चेचा विषय ठरत असते. या शाळेत मुलांना प्रत्येक विभागात उत्तम असे ज्ञान दिले जाते. सध्या या शाळेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
हा व्हिडीओ प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2018 चा असून, त्यादिवशी शिक्षकांनी शाळेतील सर्व मुलांसोबत एकत्र गीत सादर केले. “गाणे शंभरचे” या गीताचे सादरीकरण करताना सर्व मुलांनी एकत्र खाली बसून उत्तम गीत गाताना व नृत्य साकारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही नक्की म्हणाल मराठी शाळा याच श्रेष्ठ आहेत. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा
पहा व्हिडिओ :
माहिती share करायला विसरू नका…