सध्या अभिनय क्षेत्रात बोल्ड सीन दिले तरच प्रसिध्दी मिळते असे समज असतो. काही प्रमाणात ते योग्य जरी असले तरी बोल्ड सिन देऊन, अंग प्रदर्शन करूनच प्रसिद्धी मिळते, असे नाही. आपल्या सौंदर्याने व अभिनय कौशल्याने देखील प्रसिद्धी मिळविता येते.
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक अत्यंत सुंदर व मोहक अभिनेत्री आहे, जी युवा पिढीसाठी नेहमीच आकर्षणाचा बिंदू ठरत असते. तिचा गोड मोहक चेहरा पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडत असते. त्या अभिनेत्रीचे नाव आहे “मृणाल दुसानिस”. या अभिनेत्रीने अनेक मालिका चित्रपट व नाटकांमधून आपल्या दिलखेचक अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
मृणाल दुसानीसच्या साधेपणातच तिची सुंदरता दिसून येते व हाच तिच्या अभिनयातील यशाचा खरा दागिना आहे. 20 जून 1988 ला नाशिक येथे जन्म झाला. तिने आपले शालेय शिक्षण मराठा हायस्कूल, नाशिक मध्ये पूर्ण केले व नंतर एचडीपी कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. झी मराठीच्या “माझिया प्रियाला प्रित कळेना” या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. नंतर “तू तिथे मी” व “असं सासर सुरेख बाई” या मालिकेमुळे ती प्रेक्षकांना खूपच आवडू लागली.
अखेर “त्या” पार्टीतील व्हिडिओचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला. सर्वांवर होवू शकते तक्रार दाखल
25 फेब्रुवारी 2016 ला मृणाल ने अमेरिकेत राहणाऱ्या नीरज मोरे या मुलाशी विवाह केला. नीरज हा सॉफ्टवेअर इंजनिअर असून हे दोघे सध्या पॅरिस येथे राहतात. विदेशात राहत असून देखील तीने आजपर्यंत कधीच अंगप्रदर्शन करणारे सीन दिले नाहीत. तिने स्वतःचे बोल्ड फोटो देखील कधी शेयर केले नाहीत. तरीही तीला महाराष्ट्रात भरभरून प्रेम मिळत असते.
लग्नानंतर “असं सासर सुरेख बाई” या चालू मालिकेतून तिने अचानक निरोप घेतला होता. सध्या मृणाल शशांक केतकर सोबत “हे मन बावरे” ही मालिका करीत होती. या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. मृणालला भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
माहिती आवडली तर नक्की शेअर करा.