अभिनय क्षेत्रातील नटसम्राट म्हणून ओळख असणारे नाना पाटेकर यांच्या जीवनात नेहमीच चढ-उतार आले दिसले. त्यांचे नाव नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेले असते. नानांनी बॉलीवूड तसेच मराठी चित्रपट सृष्टीला अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. नाना पाटेकर हे त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे देखील अनेक वेळा चर्चेत राहिले.
नाना पाटेकर यांनी 1978 साली निलकांती यांच्यासोबत विवाह केला होता. परंतु त्यांच्या काही प्रेम कहाणी त्या काळी खूपच चर्चेचा विषय ठरल्या होत्या. खूप खूप कमी लोकांना माहिती आहे की नाना पाटेकर यांचे नाव प्रसिद्ध अभिनेत्री “मनिषा कोईराला” हिच्या सोबत जोडले होते. दोघांचे अफेअर देखील चालू असल्याची चर्चा होती. या दोघांनी “खामोशी”, “अग्निसाक्षी”, “युगपुरुष” अशा चित्रपटात एकत्र काम केले आहे.
नाना पाटेकर आणि मनीषा कोइराला या दोघांच्या वयात 21 वर्षाचा फरक असून देखील मनिषा कोईराला नाना पाटेकर यांना प्रेम करू लागली. नाना पाटेकर विवाहित आहेत हे माहिती असून देखील मनीषा ही नाना पाटेकर यांच्या प्रेमात वेडी झाली होती. त्यावेळी नाना पाटेकर आणि पत्नी निलकांती यांच्यात देखील संबंध काहीसे ठीक नव्हते.
2003 साली नाना पाटेकर यांनी “आंच” या चित्रपटात आयेशा झुल्का या अभिनेत्रीसोबत काम केले होते दोघांनी या चित्रपटात काही बोल्ड सीन देखील दिले होते. त्यानंतर नाना पाटेकर आयेशा सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या कारणाने नाना पाटेकर व मनिषा कोईराला यांच्यात ब्रेक-अप झाले होते.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा