लहान मुलांना नजरेपासून जराही दूर ठेवणे, हे नेहमीच धोक्याचे समजले जाते. कारण लहान मुले कधी कोणती गोष्ट करतील सांगता येत नाही. या कारणाने अनेकदा मोठा अनर्थ झाल्याच्या घटना घडलेल्या आपण पहिल्या आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यात एक लहान बाळ नागाच्या शेपटीला धरताना दिसून येत आहे.
बेळगाव पासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कंग्राळी बुद्रुक या गावात ही अंगावर शहारे आणणारी घटना घडली. या गावातील एक पालक आपल्या लहान मुलाला घेऊन शेतात गेले होते. शेतात गेल्यास तो लहान चिमुरडा शेतामध्ये इकडून तिकडे वावरत होता. वडिल शेतात चालतानाचा बाळाचा व्हिडिओ बनवू लागले. परंतु, व्हिडिओ बनविताना त्या व्यक्तीने आजूबाजूला जराही पाहिले नाही.
व्हिडिओ शूटिंग चालू असताना ते लहान बाळ खाली काहीतरी घेण्यासाठी झुकले. परंतु ते लहान बाळ चक्क नागाच्या शेपटीला धरत होता. त्या बाळाने जेव्हा नागाला हात लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो नाग उठून सरपटत दुसरीकडे जायला निघाला. तोपर्यंत वडिलांचे लक्ष जराही त्यांना गावाकडे गेले नव्हते.
सुदैवाने यामुळे कोणतीही वाईट घटना घडली नाही. परंतु, व्हिडिओ मधील बाळाच्या वडीलाचा तो निष्काळजपणावर सोशल मीडियावर वर संताप व्यक्त केला जात आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे.
पाहा व्हिडिओ