कोरोना मुळे सर्व सणवार ,लग्न,कार्यक्रम या सर्वांना फटका बसला आहे त्याचाच एक फटका म्हणजे यंदा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. यावर्षी बसने पंढरीच्या पालखीची वारी होणार आहे. त्यामुळे पांडुरंगाच्या चरणी संतांच्या पादुका अर्पण होण्याची अखंडित परंपरा कायम राहणार आहे.

pandhari vaari

या वारीसाठी सरकारकडून काही नियम देण्या
1. बसने जाणाऱ्या संतांच्या पालख्या रस्त्यात कोठेही न थांबता पंढरपूरसाठी मंगळवारी प्रस्थान होणार आहे. मात्र सर्व पालख्या मंगळवारी 30 जून रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत पंढरपुरात आगमन होणे आवश्यक आहे.

2. प्रत्येक पालखीसोबत बसमधून केवळ वीस वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच पालखी रस्त्यात दर्शनासाठी थांबवता येणार नाही. ३. पालखीबरोबर जाणाऱ्या वारकऱ्यांना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
४. सर्व कोवारकऱ्यांच्या कोरोना टेस्ट करणं बंधनकारक आहे.

pandhari vaari

५. सरकारकडून प्रत्येक पालखीसाठी इन्सिडेंट कमांडर म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. इन्सिडेंट कमांडर पादुका प्रस्थान केल्यापासून प्रस्थानच्या ठिकाणी पुन्हा येईपर्यंत पालखीसोबत राहणार आहे.

६. पालखीत साठ वर्षावरील वारकऱ्यांना मनाई आहे. बससोबत पुढे आणि मागे बंदोबस्त करणारी वाहने असणार आहेत.

७.पंढरपूर आणि पुन्हा पंढरपूरपासून देवस्थानापर्यंत सोबत राहणार आहेत.
८.बस मधून जाणाऱ्या वारकर्‍यांची यादी सोलापूर जिल्हाधिकार्‍यांना पाठवणं आवश्यक आहे.

माहिती share नक्की करा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *