सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर संपूर्ण भारतवर्ष हळहळला होता. त्याचे चाहते या घटनेनंतर खूप दुःखात गेले होते. सर्व स्तरातून बॉलिवूडमधील काही कलाकारांवर सूचनांच्या आत्महत्येसाठी प्रवर्त केल्याचे आरोप करण्यात आले. अगोदरच रागात असलेले सुशांतची चाहते राखी सावंत यांची एक पोस्ट पाहून आणखीन जास्त भडकले आहेत.
नेहमीच वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या राखी सावंतने एक व्हिडिओ पोस्ट करताना त्यात असे म्हटले, “सुशांत काल माझ्या स्वप्नात आला होता. माझ्या फॅन्सना सांग मी परत येतोय. तू लग्न कर आणि मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. मला बॉलीवूड मधील लोकांनी खूप त्रास दिला. मला वेडा म्हटले, मी तुझ्या पोटी जन्म घेऊन या सर्वांचा बदला घेईन.”
पुढे राखी सावंत ने स्वप्नाबद्दल बोलताना असे देखील म्हटले, “राखी तू आणि कंगनाने मला सपोर्ट केलात, माझ्या फॅन्सनी देखील मला खूप सपोर्ट केला आहे. माझा मृत्यू जरी झाला असेल तरी माझी आत्मा आणखीन जिवंत आहे आणि मी तुझ्या पोटी जन्म घेऊन परत बॉलिवूडमध्ये जाईन.” राखीने हे स्वप्न सकाळी चार वाजता पडले होते असे देखील सांगितले.
या व्हिडिओ नंतर सुशांतच्या फॅन्स नी तीला कमेंट मध्ये खूप वाईट सुनावले. ह्या वाईट प्रतिक्रिया बघून राखीने देखील फॅन्सला वाईट शब्दांचा वापर केला होता. परंतु नंतर काही वेळाने वाईट बोलल्याबद्दल माफी मागितली. परंतु ती सुशांत स्वप्नात आला होता हे खरेच आहे, असे देखील सांगते.
माहिती share नक्की करा.