नेहमीच आक्रमक भूमिकेमुळे विवादात सापडणारी केरळची कार्यकर्ती रेहाना फातिमा परत एकदा चर्चेत आली आहे. तिच्या विरुद्ध पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. नेहमीच महिलांसाठी आवाज उठविणारी रेहाना कधी कधी इतकी आक्रमक होते की ती स्वतः विवादात सापडते.
रेहाना आता तिच्या नव्या व्हिडिओ मुळे चर्चेत आली आहे. या व्हिडिओ मध्ये तिने अर्धनग्न होवून आपल्याच 2 लहान मुलांकडून शरीरावर चित्र काढून घेताना दिसून येत आहे. व्हिडिओ मध्ये ती फक्त शॉर्ट वर असून तिचा लहान मुलगा व लहान मुलगी अंगावर चित्र काढताना दिसत आहेत. केरळ मध्ये सोशल मीडियावरून रेहाना वर तीव्र प्रतिसाद उमटताना दिसत आहेत.
या व्हिडिओ साठी रेहानाने #BodyArtPolitics असे हॅश टॅग देताना व्हिडिओ पोस्ट करण्याचे कारण सांगितले आहे. सर्व महिला संभोग आणि आपल्या शरीराला घेऊन जास्त उघडपणे राहिले पाहिजे, जे या समाजात तसे होताना दिसत नाही. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तीच्यावर पोलिसात केस दाखल करण्यात आली आहे.
पाहा व्हिडिओ…..
रेहाना हिने मुस्लिम समुदायातून जन्म घेतला होता. परंतु 2019 मध्ये तीने पोलिसांना सोबत घेत एका मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर केरळ मधील मुस्लिम समुदायांनी तिची मुस्लिम धर्मातून हकालपट्टी केली होती. यापूर्वीही रेहाना ने असेच अर्धनग्न असलेल्या अनेक फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..