बॉलिवूडचा निर्वाचित अभिनेता दिवंगत सुशांत सिंह राजपूत यांनी 14 जून रोजी मुंबईत राहत्या घरी आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. सुशांत मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी लगेच या प्रकरणात बारकाईने लक्ष घातले आहे. सुशांतने असे पाऊल नेमके कशामुळे उचलले असावे याचा शोध पोलीस घेत आहेत.
याच दरम्यान सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती साठी एक वाईट बातमी समोर आली आहे. बिहार मध्ये रिया चक्रवर्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री रिया वर आरोप लावताना तिने सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले आहे, असे म्हटले आहे. मुजफ्फरपुर पताही गावात राहणाऱ्या कुंदन कुमार यांनी रियावर हा मोठा आरोप केला आहे.
यासंदर्भात कुंदन यांनी शनिवारी सिजेएम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या 24 जूनला सुनावणी होणार आहे. कुंदन कुमार यांच्या म्हणण्यानुसार रिया चक्रवर्ती यांनी सुशांत सिंगचा जोरदार वापर केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार रिया हिने सुशांतचा मानसिक व आर्थिक छळ केला आहे. रिया तिच्या करिअरमध्ये पुढे गेल्यास तिने सुशांतला सोडले, असे देखील त्यांचे म्हणणे आहे.
कुंदन कुमार यांच्या वकिलांनीही असेच काही तरी सांगितले आहे. “माझे क्लाइंट सुशांत यांचे खूप मोठे चाहते आहेत. आत्महत्या झाल्यापासून तो खूप अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे रियावर आयपीसी कलम 306 व 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा.