सुशांत सिंह राजपूत यांनी केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण देशाला एक प्रकारचा झटका बसला आहे. सुशांत चे चाहते त्याच्या केल्यानंतर सर्वत्र विरोध करताना दिसत आहेत. बॉलीवूडचे अनेक कलाकार सुशांतच्या आत्महत्येसाठी दोषी असल्याचे फॅन्सचे म्हणणे आहे. त्यातच बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान आणि करन जोहर या दोघांना सोशल मीडियावर सर्वात जास्त ट्रोल केले जात आहे.

सलमानने सुशांत चा मृत्यू जोशी श्रद्धांजलीचे ट्विट केले होते. त्यानंतर सुशांत ने केलेली आत्महत्या नसून ही एक हत्या आहे, असे सर्वत्र चर्चा होवू लागली होती. काही कलाकारांनी व दिग्दर्शकांनी याबद्दल सलमानला व करण जोहरला निशाणा धरले. सुशांतचे अनेक चित्रपट या दोघांमुळे काढून घेण्यात आले, असे देखील चर्चा होती.

20 जून रोजी सलमानने ट्विट करताना फॅन्ससाठी काही संदेश दिला आहे. “मी माझ्या सर्व फॅन्सला विनंती करतो किती सुशांतच्या फॅन सोबत रहावे आणि वाईट भाषेचा उपयोग करू नये. भावनांना समजण्याचा प्रयत्न करा. या संकट काळी सुशांतच्या परिवाराचा आश्रय बना. कोणाचेही निघून जाणे खूप दुःख देणारी गोष्ट असते.”, असे सलमान ने ट्वीट करून म्हटले.
A request to all my fans to stand with sushant's fans n not to go by the language n the curses used but to go with the emotion behind it. Pls support n stand by his family n fans as the loss of a loved one is extremely painful.
— Salman Khan (@BeingSalmanKhan) June 20, 2020
बिहार मध्ये तर एका वकिलाने सलमान खान करण जोहर एकता कपूर यांच्यासह आठ जणांवर कोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच अनेक ठिकाणी सलमान विरोधात आंदोलने होताना दिसत आहे. याचा कितपत परिणाम त्यांच्या चित्रपटावर होतो, हे येणारा काळच सांगेल.