मागील 6 महिन्यात देशात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याची ही दुसरी वेळ होती. गेल्या अनेक वर्षातील हा एक दुर्मिळ योगच म्हणावे लागेल. मात्र, या सूर्यग्रहण मध्ये एका गर्भवती महिलेने एक अजब गोष्ट केली आहे. त्या महिलेचे नाव समृध्दी चंदन जाधव आहे.
21 जून रोजी सकाळी 10 वाजल्यापासून संपूर्ण देशभरात सूर्यग्रहण पाहायला मिळाले. याच वेळी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने इस्लामपूर येथील महात्मा फुले कॉलनीत जाऊन एक धाडसाचे कार्य केले आहे. त्यांनी समृध्दी या गर्भवती महिलेला सूर्यग्रहण बद्दल असलेले सर्व नियम मोडायला सांगितले.
समृध्दी जाधव या गर्भवती महिलेने त्यांच्या बोलण्याचा मान ठेवीत, त्यांनी त्या काळात अनेक अशी कार्ये केले जे साधारणतः सूर्यग्रहण मध्ये अन्य गर्भवती महिला करीत नसतात. त्यांनी फळे कापले, भाजी चिरली, झाडाची फळं व पाने तोडले, हाताची घडी घालून बसल्या. तसेच त्यांनी शरीराच्या अनेक हालचाली करीत स्वतः चष्मा घालून सूर्य ग्रहण देखील पाहिले.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या या निर्णयाला काहींनी पाठिंबा दिला तर काहींनी त्यांच्यावर ताशेरे ओढले. समृध्दी यांनी याबद्दल बोलताना म्हटले, इंटरनेटच्या या जगात अंधश्रद्धा बाळगणे एकदम चुकीचे आहे. माझे कुटुंब देखील या निर्णयासाठी पाठीशी आहेत. विज्ञानाच्या काळात असे धाडसी पाऊल उचलायला नको का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
पाहा व्हिडिओ :
माहीती share करायला विसरू नका.